टोकियो ऑलंपिक | बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीत साई प्रणीत पराभूत

0
46

टोकियो। ऑलिंपिक्स २०२० मध्ये बुधवारी (२७ जुलै) बॅडमिंटनच्या पुरुष एकेरी गटात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. ग्रूप डीमधील सामन्यात नेदरलँडच्या मार्क कुल्जेवने भारताचा स्टार खेळाडू साई प्रणीतला २-० ने पराभूत केले. त्यामुळे तो ऑलिंपिकमधून बाहेर पडला आहे. या सामन्यात प्रणीतला एकदाही वरचढ कामगिरी करता आली नाही आणि त्याचा सरळ सेटमध्ये पराभव झाला. या सामन्यातील पहिल्या सेटमध्ये मार्कने प्रणीतला २१- १४ असे पराभूत केले. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही मार्कने प्रणीतला पहिल्या सेटप्रमाणेच २१- १४ ने पराभव स्वीकारण्यास भाग पाडले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.