राज कुंद्राला झटका | कोर्टाकडून जामीन अर्ज फेटाळला

0
141

मुंबई : पॉर्न फिल्मप्रकरणी राज कुंद्राला आणखीन एक झटका मिळाला आहे. याप्रकरणातील मुंबई कोर्टाकडून राज कुंद्राचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. राज कुंद्रा हा साक्षीदारांना प्रभावित करू शकतो असा युक्तीवाद पोलिसांनी कोर्टात केला. या युक्तीवादाच्या आधारे राज कुंद्राचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला आहे.

आज पॉर्न फिल्मप्रकरणी मुंबई कोर्टात खूप वेळ युक्तीवाद सुरू होता. बचाव पक्षाचे वकील आबाद पोंडा यांनी कोर्टात सांगितले की, या प्रकरणी चारशीट दाखल झालेली आहे. याआधी याप्रकरणी ज्या ९ जणांचा अटक करण्यात आली होती ते सर्व जामीनावर बाहेर आहेत. तसेच याप्रकरणातील आरोपी मुंबईतील रहिवाशी आहेत. त्यामुळे जेव्हा ही तपास यंत्रणांना त्यांची चौकशी करण्याची आवश्यकता असेल त्यावेळेस ते उपलब्ध राहू शकतात. पण पोलिसांनी राज कुंद्रा साक्षीदारांना प्रभावित करू शकतो आणि पुरावे नष्ट करू शकतो असा युक्तीवाद केला. या दोन्ही बाजू ऐकल्यानंतर मुंबई कोर्टाने राज कुंद्राचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

मंगळवारी राज कुंद्राला याप्रकरणी किला कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. कुंद्रा प्रकरणात ईडीने एफआयआर कॉपीची मागणी केली होती. दरम्यान राज कुंद्रा आणि रयान थोरपे या दोघांनी जामीन अर्ज दाखल केला होता. ज्यावर आज सुनावणी झाली आणि दोघांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.