गांजा प्रकरण | बाॅॅबी बेगच्या पोलीस कोठडीत एका दिवसाची वाढ

0
273

कुडाळ | प्रतिनिधी | दि. 29 

कुडाळ तालुक्यातील आकेरी घाटी येथे गांजा प्रकरणी पकडलेल्या चार संशयितांपैकी फैजल उर्फ बाँबी अन्वर बेग रा. सावंतवाडी माठेवाडा याच्या पोलीस कोठडीत जिल्हा न्यायालयाने आणखी एका दिवसाची वाढ केली आहे. तर इतर तीन जणांना यापूर्वीच न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याची माहीती कुडाळ पोलीसांनी दिली आहे.

या प्रकरणाचे मुळ गतर जिल्ह्याशी असल्याचे समोर आले असून यातील मुख्य सूत्रधार पोलिसांना हुलकावणी देत आहे. आकेरी घाटी येथे पकडलेल्या गांजा प्रकरणी पोलीस कोठडीत असलेला बॉबी उर्फ फैजल गुरुवारी संपताच त्यांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने यातील फैजल उर्फ बाँबी अन्वर बेग याला ३० जुलै पर्यंत पोलीस कोठडीत वाढ केली आहे. यातील गवस याने यातील कांडरकर युवकाला गांजा देत असताना त्याला पैसे देता न आल्याने मोबाईल ठेऊन घेतला होता. हा मोबाईल या तपासकामी ताब्यात घेण्यात आला आहे. यामध्ये अजून गांजाचा साठा आहे का? तसेच यात अन्य कोणाचा सहभाग आहे का ? याचा तपास करता यावा यासाठी पोलीसांनी फैजल बेग याला पोलीस कोठडी पुन्हा वाढवून देण्याची मागणी केली होती. यानुसार न्यायालयाने ही पोलीस कोठडी वाढवून दिली आहे अशी माहीती पोलीसांनी दिली.

यामध्ये अजून एक मुख्य सुत्रधार असून त्यालाही लवकरच पकडण्यात येणार आहे. हा परजिल्ह्यातून आणून जिल्ह्मात पुरवठा करत असल्याचे समोर आले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.