कुडाळात 10 हजारांचा गुटखा जप्त..!

0
534

कुडाळ | प्रतिनिधी | दि. २९

तालुक्यातील माणगाव बाजारपेठ, बाजारवाडी येथे अन्न व औषध भेसळ प्रशासनाने छापा टाकून केलेल्या कारवाईत १० हजार ३८० रु. चा गुटखा जप्त केला. याप्रकरणी हुसेन शहा, वय ५०, रा. मुस्लिमवाडी माणगांव यांच्यावर कुडाळ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची खबर अन्न सुरक्षा अधिकारी आनंद भाऊराव पवार यांनी कुडाळ पोलीसात दिली.

अन्न व भेसळ प्रशासन यांना मिळालेल्या गोपनिय माहीतीनुसार माणगांव बाजारपेठ येथील अफ्रोज जनरल स्टोअर्सवर छापा टाकला. यावेळी १० हजार ३८० रु. गांजा मिळून आला. यामध्ये विमलची ६ हजार १०० रु.ची ३६ पाकीटे,व्ही वन सुगंधी सुपारीची १हजार ९० रु .ची ३६पाकिटे व प्रमियम नजर ९००० गुटखाची २८८० रु ची १८ पाकिटे असा मुद्देमाल घटना स्थळावरून जप्त करण्यात आला. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी आनंद भाऊराव पवार यांनी कुडाळ पोलीसात दिलेल्या फिर्यादीनुसार हुसेन शहा यांच्यावर कुडाळ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावळे करत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.