…अखेर बेकायदेशीर कळणे मायनींगवर गुन्हा दाखल

0
331

दोडामार्ग | प्रतिनिधी | दि. 29

कळणे मायनींग कंपनीच्या निष्काळजीपणावर अखेर शिक्का मोर्तब झाला असून जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या या कंपनीवर अखेर दोडामार्ग पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा खनिकर्म अधिकारी अजित पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून भादवि कलम ३३६, ४२७, २० (अ)(२)(v)(iv) नाईस अँड मिनरल्स रेगुलेश ऍक्ट १९५७ प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळणे येथे कळणे मायनींग कंपनीच्या खाणीतून सकाळी ९ च्या सुमारास जो बांध फुटून हाहाकार उडाला त्यास मे. मिनरल्स अँड मेटल्स कंपनी जबाबदार असून मे. मिनरल्स अँड मेटल कंपनी यांचे कळणे येथे खनिज उत्खननाचे ठिकाणी डोंगराचा काही भाग कोसळून पाण्याच्या साठ्यामध्ये पडला व ते माती मिश्रित पाणी प्रभावित होऊन बांध फुटल्याने ते पाणी कळणे गावामध्ये शिरून त्यामुळे स्थानिक रहिवाशांचे शेतीचे फळबागायतीचे व प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले म्हणून खनिकर्म अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अधिक तपास दोडामार्ग पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक आर. जी. नदाफ या तपास करीत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.