नुकसानग्रस्तांना पोहोचवा तातडीन मदत : महेंद्र सांगेलकर

0
143

सावंतवाडी : दि ३१ : माडखोल धवडकी येथील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची आज काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी भेट देत पाहणी केली. तर महापुरातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा तसेच शासनाने जाहीर केलेली दहा हजार रुपयांची तातडीची मदत लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहोचवा अशी मागणी देखील यावेळी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे करण्यात आली. यावेळी माजी सरपंच संजय लाड, बबन डिसोजा, जाकी डिसोजा आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.