घरात आढळला परप्रांतीय वृद्धाचा मृतदेह | घातपात की आत्महत्या ?

0
522

सावंतवाडी  | प्रतिनिधी | दि. 5 :

एका परप्रांतीय वृध्दाचा मृतदेह सावंतवाडी खासकीलवाडा परिसरात संशयास्पदरीत्या आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार आज दुपारच्या सुमारास उघडकीस आला. संबंधित वृध्द हा सावंतवाडीत सेट्रींंगचे काम करीत होता. त्याचा मृतदेह बादलीवर बसलेल्या स्थितीत तर रक्त वाहत असलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. घराचा दरवाजा अर्धवट उघडा असल्याने घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्या तपासा सुरू आहे. ही आत्महत्या आहे की घातपात हे लवकरच उघडकीस येणार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.