९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या मराठा समाजाच्या जेलभरोमुळे आयटीआय परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही- ऍड सुहास सावंत

0
408

वेंगुर्ले: दिनांक ९ ऑगस्ट रोजी सकल मराठा समाजाचे जेलभरो आंदोलन होत आहे. त्याचदिवशी वर्षातून एकदाच होणारी केंद्रसरकारच्या अखत्यारीतील आय टी आय ची परीक्षा होत असून जिल्ह्यातील सुमारे ८०० विद्यार्थी या परीक्षेस बसणार आहेत. तरी मराठा समाजाच्या आंदोलनामुळे या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊन शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये याची काळजी घ्यावी अशी विनंती वजा निवेदन भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा युवा मोर्चाच्या वतीने मराठा समाज जिल्हा संघटक ऍड सुहास सावंत याना देण्यात आले.
यावेळी भाजप युवा मोर्चा जिल्हा चिटणीस संदीप पाटील, सरचिटणीस अभिषेक चव्हाण, कुडाळ युवा मोर्चा तालुकाअध्यक्ष सुश्मित बांबूळकर यांनी ऍड सुहास सावंत यांची भेट घेऊन हे निवेदन सादर केले. यावेळी दि ९ ऑगस्ट रोजीचे आंदोलन हे जिल्ह्यात जेलभरो आंदोलन होणार असून या दिवशी जिल्हा बंद होणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नसल्याची ग्वाही ऍड सुहास सावंत यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here