कुणकेश्वर, मिठबाव,तांबळडेग ग्रामपंचायतमध्ये नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

0
230

देवगड | प्रतिनिधी | दि. ८

कोकणचे नंबर १ महाचॅनेल सिंधुदुर्ग live ,नॅब आय हॉस्पिटल मिरज संचलित व देवगड मेडिकल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ आठवले कॅम्पसच्या वतीने आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिर देवगड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मार्फत प्रत्येक गावात आयोजित केले आहे.या शिबिरात मोफत नेत्र तपासणी करण्यात येणार असून सवलतीच्या दरात रक्त तपासणी,ecg,ऑपरेशन ,नंतर सर्व औषधेदिली जाणार आहेत.

हे नेत्र तपासणी शिबीर कुणकेश्वर ग्रामपंचायत मार्फत दर श्रावण सोमवारी आयोजित करण्यात आले आहे.मंगळवार दि 10 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 1 मिठबाव ग्रामपंचायत व दुपारी 3 ते 4:30 तांबळडेग ग्रामपंचायत येथे आयोजित करण्यात आले आहे.या नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ आठवले कॅम्पस च्या वतीने करण्यात आले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.