कणकवलीतील मटका तर सावंतवाडी जुगार अड्ड्यावर छापा

0
1678

सिंधुदुर्ग : पोलीस शाखेच्या विशेष पथकाची जिल्ह्यातील अवैध धंद्यावरील कारवाई सुरुच असून अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.  कणकवलीतील मटका तर सावंतवाडी येथील मळगाव येथे सुरु असणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकत संबधितांना ताब्यात घेतले आहे. पोलीस शाखेच्या विशेष पथकाचे जिल्ह्यातील अवैध्य धंद्यावरील कारवाई करण्याचा काम सुरु आहे. याच पथकाकडून कणकवलीतील मटका तर सावंतवाडी येथील मळगाव येथे सुरु असणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकत संबधितांना ताब्यात  घेतले आहे. यामध्ये कणकवली मटका अड्ड्यावरून दीपक मनोहर पाताडे, राजेंद्र अनंत कुंज, सुरेश सोमा कदम, लवू जगन्नाथ राणे यांना ताब्यात घेत मटका खेळण्याच्या साहित्यासह एकूण २३ हजार ९८६ एवढ्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर सावंतवाडीतील मळगाव जुगार अड्ड्यावरून रवींद्र अंकुश हरमळकर, दीपक गोपाळ जाधव,देवानंद बाळकृष्ण धारगळकर, प्रकाश गोपाळ मोघे, प्रमोद पांडुरंग पाढरे, राजाराम बापू राऊळ, आनंद मधुसूदन फ्रेंद्रे यांना ताब्यात घेऊन त्याच्या कडून ६ हजार ७०० रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. तर दोन्ही छाप्यातील आरोपींवर सावंतवाडी आणि कणकवली पोलीस ठाण्यात जुगार कायदा कलम १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.