आपल्या पाल्यांमधील गुण ओळखून त्यांना प्रोत्साहित करावे -जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे

0
574

सिंधुदुर्गनगरी : पालकांनी आपल्या पाल्यांमधील खेळाडू वृत्तीची गुण ओळखून त्यांना ज्या खेळात करिअर करु इच्छितात. त्यांना त्या खेळांबाबत प्रोत्साहित करावे, असे जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी येथे प्रतिपादन केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील जुना डिपीडीसी हॉल मध्ये राष्ट्रीय शालेय व इतर क्रिडा स्पर्धामधील सहभागी खेळाडू  यांना नैपुण्य शिष्यवृत्ती वितरण सोहळानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा क्रिडा अधिकारी किरण बोरवडेकर हे उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्हा हा छोटा जिल्हा आहे त्यामानाने या जिल्ह्यात खेळांसाठी सुविधा कमी असून सुध्दा या जिल्ह्यातील विद्यार्थी- विद्यार्थींनी खेळामध्ये राष्ट्रीय स्तर व राज्य स्तरावर प्राविण्य मिळवतात. ही बाब अभिमानास्पद आहे असे सांगून जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, पालकांनी आपल्या मुलांमधील गुण ओळखून त्यांना त्या क्षेत्रात प्राविण्य मिळविण्यासाठी प्रोत्साहित करावे. या साहेळ्यात सहभागी झालेल्या खेळाडूनी स्वत:च्या खेळाची जोपासना करावी. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा ही जशी विद्यार्थ्यांची अभ्यासाची काळजी घेते तशीच  खेळांमध्येही विद्यार्थी मागे पडणार नाही यांचीही काळजी घेतली पाहिजे. सहभागी खेळांडूनी प्राविण्य मिळविल्याबदल त्यांनी यावेळी सुभेच्छा दिल्या. सन 2017-18 मधील राष्ट्रीय शालेय व इतर क्रिडा स्पर्धामधील प्रत्यक्ष सहभागी खेळांडूना शिष्यवृत्ती वितरण पुढीलप्रमाणे. नेहा मनोहर गवस, नेहा विष्णू निगुडकर खेळ- हॅण्डबॉल, पल्लवी बाळकृष्ण शिंदे खेळ- ज्युदो, हर्षवर्धन जयसिंग नाईक व राजवर्धन जयसिंग नाईक खेळ – जलतरण, सिध्दाली श्रीकृष्ण वारंग खेळ- रायफल शुटींग, श्रीपाद नंदकिशोर नाईक  खेळ- सॉफ्टबॉल, नेविस फिदलीस डॉक्टस, अर्पित बांदेकर,अमृता माणकर,तन्वी चव्हाण व नेविस फिदलीस डाँटस  खेळ- कॅरम, या खेळांडूना शिष्यवृत्ती देण्यात आली. तसेच सन 2017-18 मधील जिल्हास्तर स्पर्धेतील प्रोत्साहनपर विजेत्या शाळा – 14 वर्षे वयोगटातील मुले व मुली-  प्रथम क्रमांक- मिलाग्रीस हायस्कुल सावंतवाडी व्दितीय क्रमांक- आंबोली पब्लिक स्कुल सावंतवाडी तृतीय क्रमांक- कासार्डे माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे यांना अनुक्रमे 01 लक्ष, 75 हजार व 50 हजार.  17 वर्षे वयोगटातील मुले व मुली- प्रथम क्रमांक- डॉन बास्को हायस्कुल ओरोस व्दितीय क्रमांक- आंबोली पब्लिक स्कुल सावंतवाडी तृत्तीय क्रमांक – सिंधुदुर्ग सैनिक स्कुल आंबोली सावंतवाडी यांना अनुक्रमे 01 लक्ष, 75 हजार व 50 हजार. तर 19 वर्षे वयोगटातील मुले व मुली प्रथम क्रमांक – श्रीम. एन.एस. पंतवालावलकर महाविद्यालय देवगड दिव्तीय क्रमांक – कणकवली कॉलेज कणकवली तृतीय क्रमांक – कुडाळ हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज कुडाळ यांना अनुक्रमे 01 लक्ष, 75 हजार व 50 हजार प्रोत्साहनपर अनुदान जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. या वितरण साहेळ्याचे प्रास्ताविक जिल्हा क्रिडा अधिकारी किरण बोरवडेकर तर क्रिडा अधिकारी मनिषा पाटील यांनी आभार मानले. या साहेळ्यात जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, पालक, खेळाडू व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.     

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.