गावठी आठवडा बाजारामुळे शेतमालाला मिळणार बाजारपेठ – सतीश सावंत

0
717
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील लहान शेतकऱ्यांच्या शेतमालाला हक्काची बाजारपेठ मिळावी या उद्देशाने सावंतवाडी पंचायत समितीच्यावतीने गावठी आठवडा बाजार भरविण्यात आला. या आठवडा बाजाराचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला. सावंतवाडी पंचायत समिती येथे गावठी आठवडा बाजाराचा जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या गावठी आठवडा बाजारामुळे शेतकऱ्यांला हक्काची जागा उपलब्ध झाली आहे. शेतकरी आता आपला शेतमाल या बाजारात विकू शकणार आहेत.  यामुळे लहान शेतकऱ्यांंच्या  शेतमालालाही चांगला भाव मिळणार आहे. या बाजाराबाबत शेतकरी वर्गातून गेले कित्येक दिवस मागणी केली जात होती. गावठी आठवडा बाजाराचा फायदा तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा असे सतीश सावंत यांनी आवाहन केले आहे. यावेळी सभापती रवींद्र मडगावकर, उपसभापती निकिता परब, नगराध्यक्ष बबन साळगावकर उपस्थित होते. 
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.