ब्रायन लाराचा विक्रम कोहलीने मोडला

0
480

बर्मिंगहॅम : सॅम क्युरान आणि बेन स्टोक्स यांनी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाच्या नाकीनऊ आणले. पण भारताचा डाव कर्णधार विराट कोहलीच्या १४९ धावांच्या खेळीने सावरला आणि भारताने सर्वबाद २७४ धावांची मजल मारली. कोहलीने या सामन्यात एक मोठा विक्रम आपल्या नावे करत ब्रायन लाराला मागे टाकले. काल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीने ७ हजार धावांचा टप्पा गाठला. त्याने यासोबतच कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ७ हजार धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला. हा विक्रम यापूर्वी ब्रायन लारा यांच्या नावे होता. कोहलीने या सामन्यात १४९ धावा केल्या. त्याने त्याच्या कसोटी कारकीर्दीतील २२ शतक ठोकले. कर्णधार म्हणून ७ हजार धावा करणारा कोहली चौथा भारतीय खेळाडू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here