वासुदेवानंद ट्रेड सेंटर येथे साकारली शिक्षणाची “पंढरी” ; सिंधू एज्युकेशन एक्स्पो दुसऱ्या दिवशी हाऊसफुल

0
548
कुडाळ : कुडाळ वासुदेवानंद ट्रेड सेंटर येथे शिक्षणाची “पंढरी” उतरली होती. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आयोजित एज्युकेशन एक्स्पोचा दुसरा दिवशी हाऊसफुल झाल होत. हजारो विद्यार्थ्यांनी भेट दिली. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजन करण्यात आलेल्या सिंधू एज्युकेशन एक्स्पोला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच हे प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थी व पालकांच्या लांबच लाब रांगा लागल्या होत्या. जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, बांधकाम सभापती संतोष साटविलकर, जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत हे विद्यार्थी व पालकांचे स्वागत करत होते. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस, सुनील मंदुरूपकर, अजय पाटील यांनीही या प्रदर्शनाला भेट दिली.  हजारो विद्यार्थी प्रदर्शनात दाखल झाल्याने वासुदेवानंद ट्रेड सेंटर येथे जणू काही शिक्षणाची पंढरी साकारली होती. स्टॉलवर अनेकांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती. 
ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.