राणे समर्थक आणि शिवसेनेत रंगतेय बॅनर वॉर !

0
389

सिंधुदुर्ग  | प्रतिनिधी | दि. २९

राणे आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेनिमित्त जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपामध्ये बॅनर वॉर पहायला मिळत आहे. ‘ते असताना नाही संपवू शकले तर, ते नसताना काय संपवणार ? अशा आशयाचे बॅनर राणे समर्थकांनी लावले होते. त्याला आमदार वैभव नाईक यांनी बॅनरच्या माध्यमातूनच जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. स्वर्गीय बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळेच १९ ऑक्टोबर २०१४ ला जायंट किलर. ते राज्यात मंत्री असताना कोकणात पराभूत केले…ते केंद्रात मंत्री होऊन काय फरक पडणार ? असा सवाल उपस्थित करत राणेंना टोला लगावला आहे. या बॅनरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा जिल्ह्यात सुरू आहे. आज या यात्रेचा समारोप होत आहे. राणेंच्या मुंबई ते सिंधुदुर्ग या यात्रे दरम्यान आरोप प्रत्यारोप आणि बॅनर वॉर पहायला मिळाले. या मध्ये राणेंनी शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. दोन्ही बाजूने इशारे प्रति इशारे देण्यात आले. यावेळी राणे समर्थकांनी लावलेला बॅनर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता. यामध्ये म्हटलं आहे ‘ ते असताना नाही संपवू शकले तर, ते नसताना काय संपवणार ? #’दादा’गिरी अशा आशयाचे बॅनर लावून शिवसेनेला डीवचण्याचा प्रयत्न केला होता. आता याला शिवसेनेने बॅनरच्याच माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ‘ते राज्यात मंत्री असताना कोकणात पराभूत केले…ते केंद्रात मंत्री होऊन काय फरक पडणार ? असा सवाल उपस्थित करत राणेंना टोला लगवण्यात आला आहे. सध्या हा बॅनर चर्चेत आला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.