आज गटारी नव्हे तर दीप अमावस्या : प्रसिद्ध ज्योतिष अभ्यासक विलास वेंदे

0
3739
burning-oil-lamp मुंबई : आज गटारी नव्हे तर दीप अमावस्या आहे आणि या दिवशी विशेष धार्मिक विधी करण्याने दीर्घायुष्य लाभत, अशी माहिती  प्रसिद्ध ज्योतिष अभ्यासक विलास वेंदे यांनी ‘सिंधुदुर्ग लाईव्ह’शी बोलताना दिली.
ते म्हणाले, आज गटारी अमावस्या शुक्रवार दिनांक १० रोजी सायंकाळी ७ वा. ८ मी. पासुन ते शनिवारी दुपारी ३ वा. २८ मी. पर्यंत आहे. मी गटारी हा शब्दप्रयोग मुद्दाम करतोय, कारण दीप अमावस्या हा शब्द फार कुणाच्या ऐकण्यात बोलण्यात येत नाही. या अमावस्येचं विषेश महत्व आहे, ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. खास करून महिलांसाठी. आज एकेक करून आपण आपली संस्कृती आणि धर्माचार विसरत चाललो आहोत. शिवाय सांगणारंही कुणी राहिलं नाही. आपली संस्कृती आपण जपायला हवी. अभिमानाने जातीचा टेंबा  मिरवतात पण कुळाचार, धर्माचार आपण करत नाही.. या दिवशी घरातील स्त्रीयांनी घरातील दिवे, दिवट्या, पणत्या, समई घासून, पुसून स्वच्छ कराव्यात. सायंकाळी रांगोळी काढून दिवा ठेवावा. आकाशाला दिव्याने ओवाळावं. आपण श्रीगणेशाला अर्पण करतो त्या दुर्वा दीर्घायुष्याचं प्रतिक आहे. त्या दुर्वा वाहाव्यात. दिवे प्रज्वलीत करून पुढील मंत्राने दिव्याला प्रार्थना करावी.
‘‘दीप सूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेज उत्तमम्‌ | गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव॥
लहान मुलांचे औक्षण करावं. गुळ पोह्यांचा नैवेद करून प्रसाद वाटावा. 
चातुर्मासात यमधर्म प्रबळ होतो. त्यामुळे चातुर्मास सूरू झाल्यावर पहिली अमावस्या येते ती यम अमावस्या. याला दिप अमावस्या म्हणतात. आपल्या घरात अथवा कुळात अपघाती अथवा अल्पवयात म्रुत्यु झालेल्याना मुक्ती मिळावी आणि पुढे होऊ नये म्हणुन प्रार्थना करावी. मुलांना दीर्घायुष्य लाभावं अशी प्रार्थना करावी. आपल्या घरातील लहान मुलं जे पुढे आपल्या कुळाची घराची वेल वाढवणारेत, किर्ती करणारेत त्या लहानग्यांना नमस्कार करा आज. पाहा किती सुंदर आहे हे सर्व पण आपण मात्र…गटारीच्या दिवशी सकाळी सकाळी उठायचं आणि पहिला खाटिक शोधायचा, हि भली लांब मोठ्ठी रांग…घरी  ते मटण सोपवलं कि मग मस्त फ्रेश वगैरे होउन ऑफिसमधल्या मित्रांसोबत लिटिल लिटिल पेग वडायचे, जेवणापर्यंत तराट व्हायचं..जेवण झालं की दिवसभर झोपायचं. सायंकाळी पार दिवेलागणीची वेळ सरून गेली की उठायचं. ऐरियातील मित्रांसोबत ओवर नाईट प्यायची. कि मग आला श्रावण..योग्य अयोग्य ज्याचे त्याने ठरवा..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here