सैनिकांचा अवमान करणाऱ्या ग्रामसेवक व ग्रामविस्तार अधिकारी यांची तात्काळ बदली करावी : सभापती लक्ष्मण रावराणे यांचे आदेश

0
680
वैभववाडी : वैभववाडी तालुक्यातील लोरे व आचिर्णे गावात सैनिक आणि त्यांच्या नातेवाईकांचा अवमान केल्याचा प्रकार समोर आला. याची सभापती लक्ष्मण रावराणे यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी याबाबत संबंधित ग्रामसेवक व ग्रामविस्तार अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करण्याचे आदेश दिले. तसेच यांचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात यावा अशी सुचना गटविकास अधिकाऱ्यांना आजच्या पंचायत समितीच्या सभेत दिली. वैभववाडी पंचायत समितीची मासिक सभा सभापती लक्ष्मण रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.सभेत लोरे व आचिर्णे येथे सैनिक आणि त्यांच्या नातेवाईकांना शासकीय कर्मचाऱ्यांकडून झालेल्या मनस्तापाचा विषय चर्चेत आला.यावर सभापती रावराणे हे आक्रमक झाले. सैनिकांच्या नातेवाईकांचा मृत्यू दाखला वेळेत मिळत नाही, माजी सैनिकांना शुल्लक कारणावरुन नोटीसा पाठविणे असे प्रकार तालुक्यात सुरू आहेत. हे वागणे शोभनीय नाही. सैनिकांनाबाबत जर कर्मचारी असे वागत असतील तर सर्वसामान्य काय न्याय देत आसतील हे यावरून दिसून येते.अशी खंत सभापती यांनी व्यक्त केली. लोरे व आचिर्णे येथे सैनिकांच्याबाबतीत झालेला प्रकार गंभीर आहे.संबंधित ग्रामसेवक व ग्रामसेवकाला पाठीशी घालणाऱ्या ग्रामविस्तार अधिकारी यांची तात्काळ बदली करण्याचे आदेश सभापती यांनी दिले. तसेच यांचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्याची सुचना देखील त्यांनी दिली.शहीद मेजर कौस्तुभ रावराणे यांच वैभववाडीत स्मारक  व त्यांच्या नावाने सैनिक अॅकॅॅडमी सुरू करण्यात यावी अशी मागणी सदस्य मंगेश लोके यांनी केली. भुईबावडा – जांभवडे रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी सदस्या दिव्या खानविलकर यांनी केली. लोरे व आचिर्णे येथील सैनिक व त्यांच्या नातेवाईकांच्या बाबतीत घडलेल्या प्रकाराचा विषय शुक्रवारच्या सभेत चर्चेचा ठरला. उपसभापती हर्षदा हरयाण वगळता इतर सदस्यांनी कर्मचाऱ्यांच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली.
ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here