कोकणच्या मातीत देशभक्तीची बीजे रूजली आहेत – राजेंद्र सावंत्रे

0
824

दोडामार्ग: कोकणनेच देशाला खर्‍या अर्थाने राष्ट्रभक्ती शिकवली. या कोकणच्या मातीतच अनेक झुंजार देशभक्त निर्माण झाले, त्यांचा वारसा पुढे चालवा असे उद्गार दोडामार्ग पोलिस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी काढले. दोडामार्ग सिंधु साहित्य संघ आयोजित व कै. नामदेव बाबी गावडे यांच्या स्मरणार्थ पुरस्कृत तालुका स्तरीय देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेवेळी ते बोलत होते. दोडामार्ग इंग्लिश स्कूल मध्ये झालेल्या या तालुकास्तरीय स्पर्धेत कोनाळकट्टा माध्यमिक विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकाविला. यावेळी व्यासपीठावर माजी सैनिक पतसंस्था अध्यक्ष रमेश दळवी कार्यक्रमाचे प्रायोजक प्रदीप गावडे, चंद्र्कांत गावस, पत्रकार संदीप गवस, प्रेमप्रकाश नाईक, संदीप देसाई, लखू खरवत, अध्यक्ष रघुनाथ सोनवलकर, पत्रकार तेजस देसाई,रत्नदीप गवस,संदेश देसाई आदि उपस्थित होते. यावेळी कोनाळकट्टा हायस्कूलने “उंच उंच गगनात तिरंगा डौलाने फडकतो” हे गीत सादर करून प्रथम क्रमांक, प्रा.केंद्र शाळा सोनावल यांनी या “देशाच्या शूरवीराना आमुची ही सलामी” हे गीत सादर करून द्वितीय, तर “वेडात मराठे वीर दौडले सात” हे गीत सादर करून कळणे हायस्कूलने तृतीय व “नव्या युगाचे वाचक आम्ही” हे गीत सादर करून मांगेली देऊळवाडी प्रा. शाळेने उत्तेजनार्थ क्रमांक पटकविला. मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम देवून त्यांना गौरविण्यात आले. या स्पर्धेत प्रा.शाळा आयनोडे पुनर्वसन,आवाडे,मणेरी,दोडामार्ग नं १ व २ ,सासोली केंद्र शाळा तर माध्यमिक पिकुळे, दोडामार्ग हायस्कूल, भेडशी हायस्कूल या शाळा सहभागी झाल्या होत्या.स्वर ताल संगीत विद्यालय दोडामार्ग यांनी संगीताची साथ दिली. कार्यकर्माचे प्रास्ताविक सतीश धर्णे यांनी तर सूत्रसंचालन सुमित दळवी यांनी केले. आभार सोनवलकर यांनी मानले. यावेळी प्रेमप्रकाश नाईक यांनी गीत बसवत असताना घ्यावयाची काळजी या विषय मार्गदर्शन केले. संदीप देसाई व प्रदीप गावडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुमन कासार, स्नेहल गवस, नितिन धर्णे, निवेदिता पारकर यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे परीक्षण संदीप गवस व प्रेमप्रकाश नाईक यांनी केले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.