मुंबई आयआयटीला १ हजार कोटी देणार, पंतप्रधान मोदींची घोषणा

0
652

 मुंबई  : पायाभूत सुविधांसाठी मुंबई आयआयटीला १ हजार कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनीकेली. तसेच भारतातील आयआयटी मुलांचा जगभरात डंका असून त्यामध्ये मुंबईच्या आयआयटीमधील विद्यार्थ्यांना प्रभाव आहे. त्यामुळेच स्टार्टअप क्षेत्रात भारत जगात दुसऱ्या स्थानावर असल्याचेही मोदींनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीआज मुंबई दौऱ्यावर असून सकाळीभारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईच्या ५६व्या दीक्षान्त समारंभात बोलताना मोदींनी मुंबईतील आयआयटी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच मुंबई आयआयटीच्या विकासासाठी १ हजार कोटींचा निधी देणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. या दीक्षान्त समारंभानंतर येथील पर्यावरणीय विज्ञान व अभियांत्रिकी केंद्र, ऊर्जा विज्ञान व अभियांत्रिकी विभागाच्या नव्या इमारतीचे उद्घाटनही मोदींच्या हस्ते झाले. पंतप्रधानांसह दीक्षान्त सोहळ्याला मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. आयआयटीच्या वतीने सिम्फनी टेक्नोलॉजी ग्रुपचे संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रोमेश टी. वाधवानी यांना डी लिट प्रदान करण्यात आली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.