ब्रेकिंग न्यूज | रोहित शर्मा होणार कर्णधार | विराट कर्णधारपद सोडण्याच्या तयारीत

0
1277

मुंबई | प्रतिनिधी | दि. १३ :

आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर भारताचा कर्णधार व स्टार फलंदाज विराट कोहली कर्णधारपद सोडण्याच्या मानसिकतेत आहे. जर विराट कोहलीने कर्णधारपद सोडले तर मुंबईकर रोहित शर्मा भारताचा एकदिवसीय आणि टी-20 कर्णधार होणार आहे. याबाबत बीसीसीआयने अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नसला तरी याबाबत केवळ प्राथमिक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र विराटच्या कर्णधारपद सोडण्याच्या बाबतीत विश्वासहार्य समजल्या जाणाऱ्या टाईम्स ऑफ इंडियाने हे वृत्त प्रसारित केले आहे

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.