तळेरे-वैभववाडी रास्थ्यवरील खड्डे ठरतायत जीव घेणे | 2 वर्षातच रस्त्याची दुरवस्था

0
184

कणकवली | प्रतिनिधी | दि. १५ :

तळेरे वैभववाडी मार्गे कोल्हापूर जाणाऱ्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून या रस्त्यावरून प्रवास करणे जीवघेणे ठरत असल्याचे बोलले जात आहे कारण रात्री काळोखाच्या ठिकाणी प्रवास करताना दुचाकीस्वार किंवा चार चाकी खड्ड्यात जाऊन मोठा अपघात होऊ एखाद्याचा जीवही जाऊ शकतो त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर भरले जावेत अशी अपेक्षा तरळेवासी करत आहेत

मागील दोन वर्षातच तरळे वैभववाडी ते कोल्हापूर पर्यंतचा हा रस्ता दुरुस्त करून डांबरीकरण करण्यात आला होता पण अवघ्या दोनच वर्षात या रस्त्याची मोठी दुरवस्था झाल्याने हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे दिसत आहे
सध्या गणेश चतुर्थी निमित्त सिंधुदुर्गात येणारे चाकरमाने आणि पर्यटकांना या खड्डेमय रस्त्याचा सामना करावा लागत असल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून याच्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर उपाय योजना करावी अशी अपेक्षा तरळे येथील रहिवासी करत आहेत

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.