IPL प्रेमींना खुशखबर ! सामने स्टेडीयममधून पाहता येणार

0
304

यूएई | दि. 15 

इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात मैदानात प्रेक्षकांचा आवाज घुमणार आहे. कारण आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात प्रेक्षकांना मैदाना उपस्थित राहण्याची परवानगी मिळाली आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या आयोजकांनी याबाबत माहिती दिली. संयुक्त अरब अमिरातमध्ये 19 सप्टेंबरपासून आयपीएलचे सामने खेळवले जाणार आहेत.

 

क्रिकेट फॅन्स उद्यापासून म्हणजे 16 सप्टेंबरपासून सामन्यांचे तिकीट ऑनलाईन बूक करू शकतील. IPL च्या अधिकृत वेबसाईट www.iplt20.com वरून प्रेक्षकांना तिकिटे खरेदी करता येतील. आयपीएलचे उर्वरित 31 सामने 19 सप्टेंबरपासून खेळवले जाणार आहेत. हे सामने दुबई, शारजाह आणि अबू धाबी येथे मर्यादित प्रेक्षकांसह खेळवले जातील. मात्र किती प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळेल याबद्दल काहीही सांगितले गेले नाही. या दरम्यान, कोविड प्रोटोकॉल आणि यूएई सरकारच्या कोरोना संबंधित नियमांचे पालन केले जाईल.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.