आजच्या महत्वाच्या बातम्या…

0
100

सावंतवाडी | प्रतिनिधी | दि. १९ :

♦️ राज्यभरात कोविडचे नियम पाळून घरगुती बाप्पाला भावपूर्ण निरोप, कृत्रिम आणि फिरत्या तलावाला प्राधान्य, लालबागच्या राजाचंही मोठ्या उत्साहात विसर्जन..

♦️पंजाबला मिळाला नवा ‘कॅप्टन’, सोनिया गांधींकडून पंजाबच्या मुख्यमंत्रिपदी चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब.. हरिश रावत यांची माहिती. पंजाबमध्ये 2 उपमुख्यमंत्री असणार..

♦️श्रीमंतांच्या गाडीत 8 एअरबॅग सर्वसामान्यांच्या गाडीत फक्त 2-3 एअरबॅग का? नितीन गडकरींचा कार निर्मात्या कंपन्यांना सवाल.. किमान 6 एअरबॅग असाव्यात..

♦️ ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाला आजपासून सुरुवात..
सायंकाळी सात वाजता ‘बिग बॉस मराठी 3’चा ग्रँड प्रीमिअर. शंभर दिवस वेगवेगळ्या क्षेत्रातील 15 सेलिब्रिटी ‘बिग बॉस’च्या घरात एकत्र बंदिस्त.

♦️ अफगाणिस्तानबाबत अमेरिकेची बाजू घेतल्याची पाकिस्तानला खूप मोठी किंमत मोजावी लागली.. पंतप्रधान इम्रान खान. अमेरिकन खासदारांच्या टीकेला इम्रान खान यांचे उत्तर.

♦️ राज्यसभेच्या सात रिक्त जागांसाठी येत्या ४ ऑक्टोबरला पोटनिवडणुका. भाजपकडून केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल व राज्यमंत्री एल. मुरुगन यांना अनुक्रमे आसाम व मध्य प्रदेशमधून उमेदवारी जाहीर.

♦️ अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वेतनस्तरीय निवड प्रक्रियेद्वारे एच -1 बी व्हिसा निवडीसाठी सध्याची लॉटरी पद्धत बदलण्याचा प्रस्तावित नियम अमेरिकेच्या फेडरल कोर्टाने रद्द केला. भारतीयांना फायदा होणार..

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.