आताची सर्वात मोठी राजकीय बातमी | किरीट सोमय्या महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरकडे रवाना

0
92

मुंबई (पाॅलिटिकल ब्युरो) दि. 19 :

किरीट सोमय्या कल्याण रेल्वे स्थानकात दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात कल्याण हून कोल्हापूरच्या दिशेने ते महालक्ष्मी एक्सप्रेस ने कोल्हापूर ला प्रयाण करणार आहेत. महालक्ष्मी एक्सप्रेस मध्ये ते सध्या बसून कोल्हापूरच्या दिशेने रवाना होत आहेत. कल्याण रेल्वे स्थानकात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.सीएसटी रेल्वे पोलिसांनी किरीट सोमय्या यांना रोखले होते. मात्र जिगरबाज पणा दाखवत पोलिसांच्या दडपशाहीला न जुमानता महालक्ष्मी रेल्वे मध्ये घुसले.मला कोल्हापूर पर्यंत जाण्यासाठी तुम्ही कोणीही रोखू शकत नाही. किरीट सोमय्या यांनी पोलिसांना बजावले. किरीट सोमय्या यांच्यासोबत मोठे सुरक्षाकवच. मीडिया चे मोठे पथकही किरीट सोमय्या सोबत दाखल होत आहे. कोल्हापुरात सीएसटी व दादर चा एक टप्पा पूर्ण करत हाय अल्ट्रा होल्टेज ड्रामा करत पोहोचले कल्याण रेल्वे स्टेशन वर. कल्याण रेल्वेने कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले आहेत.पुणे स्टेशन वर किंवा मिरज रेल्वे स्टेशन वर अटक होण्याची दाट शक्यता. सिंधुदुर्ग लाईव्ह ला सूत्रांची माहिती. किरीट सोमय्या कोल्हापुरात उद्या पोहोचले तर होऊ शकतो हाय होल्टेज ड्रामा. कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले किरीट सोमय्या यांना नोटीस. कोल्हापुरात प्रवेश बंदीची बजावण्यात आली नोटीस. सीएसटी, दादर, कल्याण असा हाय होलटेज ड्रामा करत सोमया आता कोल्हापूरच्या दिशेने रवाना. सोमय्या कोल्हापुरात उद्या दाखल झाल्यास सोमवारी सोमय्या विरुद्ध हसन मुश्रीफ असा होऊ शकतो आमने-सामने मुकाबला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.