वॉटर कप २०१८ : सातारा जिल्ह्यातील टाकेवाडी गावला पहिला पुरस्कार ; राज्य सरकारकडून अतिरिक्त २५ लाखांचे बक्षीस

0
613

पुणे : पाणी फाउंडेशनकडून घेण्यात येणाऱ्या वॉटर कप स्पर्धेच्या कार्यक्रमास असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी सुरुवात झाली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी उप-मुख्यमंत्री अजित पवार आणि राज ठाकरेंसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमातील भाषणात अभिनेता आमिर खानने महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प फक्त आपला नव्हे, तर राज्यातील ११ कोटी जनतेचा आहे असे म्हटले आहे. सोबतच, हे काम सर्वांचे असून सर्वांनी केल्यानंतरच यशस्वी होईल असेही आमिर खान म्हणाले. सातारा जिल्ह्यातील टाकेवाडी गावाला पहिले पुरस्कार जाहीर झाले. या गावाला पुरस्काराची रक्कम ७५ लाख आणि मानचिन्ह दिले जाणार आहे. सोबतच, राज्य सरकारकडून अतिरिक्त २५ लाखांचे बक्षीस मिळणार आहे. साताऱ्यातील मांडवी गावाला दुसरा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. बुलडाण्यातील सिंदखेड गावालाही दुसरा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या दोन्ही गावांना पुरस्काराची रक्कम २५-२५ लाख अशी विभागून दिली जाणार आहे. यांनाही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या राज्य शासनाकडून अतिरिक्त १५ लाख रुपये विभागून दिले जातील. बीड जिल्ह्यातील आनंदवाडी गावाला तिसरा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सोबतच नागपूर जिल्ह्यातील उमठा गावाला सुद्धा तिसरे पुरस्कार देण्यात आले आहे. या दोन्ही गावांना तिसरे पुरस्कार विभागून दिले जाणार आहे. राज्य सरकारकडून त्यांना १० लाख रुपये दिले जाणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.