८ दारू अड्डयांवर तर २ जुगार अड्डयांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

0
611

सिंधुदुर्गनगरी :  सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात चोरीप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पुणे येथून ताब्यात घेतले आहे तसेच त्याच्याकडून चोरीस गेलेला एक मोबाईलही हस्तगत केला आहे. संशयित आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलिस कोठडी सुणावली आहे. दोन मोबाईल, एक एक्सर्टनल हार्ड डिक्स असा एकूण ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल  मोबाईल शॉपीमधून चोरीस गेल्याबाबत सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याच्या तपास जिल्हा पोलीस अधिक्षकांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपविला होता. या गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात घेण्यासाठी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने गोपनीय माहिती मिळवित आपले एक पथक आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पुण्याला पाठविले होते. या पथकाने सापळा रचुन एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. या संशयिताकडून एक मोबाईलही हस्तगत करण्यात आला आहे. संबंधित संशयित आरोपीला जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुणावली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून देण्यात आली. जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या सुचनेनुसार शनिवार दि. ११ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली होती. यात ८ दारू अड्डयांवर तर २ जुगार अड्डयांवर धाड टाकून कारवाई करण्यात आली आहे. अवैध धंद्यांविरोधात ही कारवाई अशीच सुरु राहणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

पोर्टल घ्या ही

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.