दोडामार्ग – कुडासे खुर्द ग्रामपंचायतीला लोकराज्य ग्राम पुरस्कार

0
586

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात गेली दोन वर्षे संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभीयानात उत्कृष्ट कामगिरी करत जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त कुडासे खुर्द (पाल पुनर्वसन ) ग्रामपंचायतिने यावर्षी सन 2017/18 मधे तालुक्यात प्रथम क्रमांकाचा मान मिळवत एक लाख रुपयाचे बक्षिस व सन्मान चिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले होते. रविवारी ओरोस शरद कृषी भवन येथे या ग्रामपंचायतीला लोकराज्य ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. गृह राज्यमंत्री तथा पालक मंत्री दीपक केसरकर व जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाण पत्र देऊन कुडासे खुर्द सरपंच सौ. संगीता सुहास देसाई याना गौरविण्यात आले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बादीवडेकर आदी उपस्थित होते

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.