वैश्यवाडा येथील २१ दिवसांच्या बाप्पाला ५५२१ मोदकांचा नैवेद्य

0
185

सावंतवाडी | प्रतिनिधी | दि. २४ :

वैश्यवाडा येथील सार्वजनिक गणेश मंडळाच्या २१ दिवसाच्या गणरायाला आज संकष्टी चतुर्थीनिमित्त ५५२१ मोदकांचा नैवेद्य दाखविण्यात आला.

वैश्यवाडा येथील सार्वजनिक गणेश मंडळातर्फे दरवर्षी २१ दिवस गणपतीचे पूजन केले जाते. आज संकष्टी चतुर्थी असल्याने या गणपतीला ५५२१ मोदकांचा नैवैद्य दाखविण्यात आला. त्यानंतर गणपतीची आरती करण्यात आली. आरती नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. संकष्टी चतुर्थी असल्याने शहरातील व तालुक्यातील भक्तगणांनी गणपतीचे दर्शन घेतले. रोज विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.