राज्यस्तरीय कुन-डो चॅम्पियनशिप मध्ये दीक्षा पारकर, जान्हवी बाक्रे यांना सुवर्णपदक

0
253

देवगड  | प्रतिनिधी | दि. ३० :

२०२१ मधील द्वितीय राज्यस्तरीय जीत कुन-डो चॅम्पियनशिप पंढरपूर येथे आयोजित करण्यात आली होती . या
पंढरपुर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय कुन-डो चॅम्पियनशिपमध्ये देवगड तालुक्यातील वरेरी येथील कु दीक्षा चंद्रकांत पारकर,आणि कु जान्हवी नागेश बाक्रे यांनी १९ वयोगटातील ५५.१ किलोग्राम. वजन गटात प्रथम क्रमांक पटकावत अप्रतिम कामगिरी करत दोघींनीही सुवर्णपदक प्राप्त केले आहे. तसेच पुढील महिन्यात जयपूर राजस्थान येथे होणाऱ्या नॅशनल कुन-डो तायक्वांदो स्पर्धेसाठी दोघांचीही निवड झाली आहे.

या यशाबद्दल राष्ट्रीय युवक कॉग्रेस कार्याध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी कु. दीक्षा पारकर,आणि कु जान्हवी बाक्रे यांच्या घरी जाऊन अभिनंदन करून त्यांचा सन्मान करत शाबासकीची थाप दिली. वरेरी गावच्या या दोन सुकन्यांनी मिळविलेले सुयश हे देवगड तालुक्यासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय युवक कॉग्रेस सिंधुदुर्ग कार्याध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी व्यक्त केले आहे,यावेळी चंद्रकांत उर्फ बाळा पारकर,देवगड युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष सूरज घाडी,एन एस यु आय देवगड अध्यक्ष गणेश कांबळी उपस्थित होते,

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.