सलग दहाव्या वर्षी मुकेश अंबानी आशियातील सर्वाधिक श्रीमंत

0
144

नवी दिल्ली | दि. 01

कोरोना काळात देशातील सामान्य जनता रस्त्यावर आली असताना, भारतीय अर्थव्यवस्थेला त्याचा जबर फटका बसला असतानाही भारतीय श्रीमंतांच्या संपत्तीत मात्र लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. Hurun India ने नुकतेच जाहीर केलेल्या आशियातील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीत रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे टॉपवर आहेत. विशेष म्हणजे मुकेश अंबानीनी सलग दहाव्या वर्षी या यादीत आपलं सर्वोच्च स्थान कायम ठेवलं आहे. दुसऱ्या क्रमांकावर अदानी उद्योग समूहाचे प्रमुख गौतम अदानी आहेत.

 

IIFL वेल्थ ह्युरन इंडियाने आशियातील सर्वाधिक श्रीमंत लोकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये गौतम अदानींची संपत्ती मोठ्या प्रमाणात वाढल्याचं स्पष्ट झालं आहे. रोजच्या कमाईच्या बाबतीत गौतम अदानींनी आता मुकेश अंबानीना मागे टाकल्याचं दिसतंय. गेल्या वर्षीच्या काळात रिलायन्सच्या मुकेश अंबानींची संपत्ती रोज 163 कोटी रुपयांनी वाढली तर  गौतम अदानींची संपत्ती रोज 1002 कोटींनी वाढली आहे. आशियातील सर्वात श्रीमंत अशा 1007 लोकांच्या यादीत 255 जण केवळ मुंबईतील असून 167 जण दिल्ली आणि 85 जण बंगळुरुमधील आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.