ममता बॅनर्जींची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचली

0
71

कोलकाता | प्रतिनिधी  | दि. 03

तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जींची पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची खुर्ची वाचली आहे. भवानीपूर मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी भाजपच्या प्रियांका टिबरेवाल यांच्यावर तब्बल 58 हजार मतांनी विजय मिळवला आहे. त्यांच्या या विजयानंतर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोश साजरा करायला सुरुवात केली असून ममता बॅनर्जींचे घर आणि पक्षाच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे.

 

ममता बॅनर्जी यांना 1 लाख 15 हजार मतं मिळाली आहेत. दक्षिण कोलकात्याचा भाग असलेल्या भवानीपूर मतदारसंघातील सर्व वार्डातून ममता बॅनर्जी यांना मताधिक्य मिळालं आहे हे विशेष. इतक्या मोठ्या मताधिक्यांने मिळालेला हा विजय एक विक्रम आहे. या विजयानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भवानीपूरच्या सर्व मतदारांचे आभार मानले आहेत.

 

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मतदानाच्या पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. त्यांनी ज्यावेळी 12 हजाराहून अधिक मतांची आघाडी घेतली त्यावेळी तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरासमोर जल्लोश सुरु केला. या मतमोजणीमध्ये एकूण 21 राऊंड होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.