‘नट्टू काकांची’ कॅन्सरशी झुंज अपयशी

0
91

सावंतवाडी | प्रतिनिधी | दि. 03

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेत नट्टू काकांची भूमिका रंगविणारे सुप्रसिद्ध अभिनेते घनश्याम नायक यांचे आज निधन झाले आहे. वयाच्या 78 व्या वर्षी घनश्याम नायक यांची प्राणज्योत मालवली. घनश्याम नायक यांना कर्करोग झाल्याचे गेल्याच वर्षी स्पष्ट झाले होते. त्यानंतर सातत्याने त्यांच्यावर उपचारही सुरू झाले होते, मात्र आज अखेर कॅन्सरशी झुंज देताना नट्टू काका जगाचा अखेरचा निरोप घेऊन निघून गेले.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेमुळे नट्टू काका भारतात आणि विदेशातही राहणाऱ्या भारतीय लोकांच्या घराघरात पोहोचले आहेत. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून नट्टू काकांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. बालकांपासून आबालवृद्धांपर्यंत ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेचे असंख्य चाहते आहेत. नट्टू काकांच्या निधनाची वार्ता वाऱ्यासारखी पसरली आणि नट्टू काकांच्या चाहत्यांना धक्काच बसला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.