जखमी घुबडाला प्राणी मित्रांकडून जीवदान

0
33

सावंतवाडी | प्रतिनिधी | दि. १३ :

रेल्वेची धडक बसल्यामुळे दुर्मिळ जातीचे घुबड सोनुर्ली येथील रेल्वे ट्रॅक परिसरात जखमी अवस्थेत आढळून आले. “युरेशियन ईगल आऊल” असे या घुबडाचे नाव आहे. हा प्रकार रेल्वे कर्मचारी रुपेश चिंदरकर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी प्राणीमित्र अक्षय जाधव व विशाल धारगळकर यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत “त्या” जखमी घुबडावर प्रथमोपचार करत वनविभागाच्या ताब्यात दिले. याबाबत वनअधिकारी सुभाष पुराणिक यांनी दुजोरा दिला आहे. मोठी झाडे नष्ट झाल्यामुळे ही घुबडाची जात दुर्मिळ झाली आहे. त्याच्यावर याठिकाणी उपचार होणे गरजेचे आहे. परंतु पशुवैद्यकीय दवाखाना नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण होणार आहेत. दरम्यान त्या घुबडावर उपचार करणा-या युवकांचे आपण कौतुक करतो असे त्यांनी सांगितले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.