ओसरगाव जि. प. शाळा नं. १ च्या संगणक कक्षाचे उद्घाटन !

0
42

कणकवली | प्रतिनिधी | दि. १३ :

ओसरगाव जि. प. शाळा नं. १ च्या शतक महोत्सवानिमित्त संगणक कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. हा अद्यावत संगणक कक्षाचे उद्घाटन कार्यक्रम व गेटचे अनावरण नुतन शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) डॉ. मुश्ताक शेख यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी सरपंच प्रमोद कावले यांच्या अध्यक्षतेखाली आणि जि. प. सदस्य सायली सावंत, पं. स. सदस्य मिलिंद मेस्री, गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, मुख्याध्यापिका प्रियांका मोडक, केंद्र प्रमुख सुरेश हरकुळकर यांच्या उपस्थितीत दिनांक १२ ऑक्टोबर रोजी पार पडला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माजी विद्यार्थी शैलेश तांबे आणि आभारप्रदर्शन विवेक परब यांनी केले. या प्रसंगी शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा वाढता आलेख आणि माजी विद्यार्थ्यांनी जि. प. शाळेची केलेली उन्नती पाहून उपस्थित मान्यवरांनी गौरवोद्गार काढले. तसेच ही शाळा भविष्यात इतिहास घडवेल, अशा शुभेच्छाही दिल्या. यावेळी संगणकदाते विलास राणे यांचा सत्कार करण्यात आला. घनश्याम राणे यांनी मुलांसाठी शिष्यवृत्ती जाहीर केली. मुलांनी विलास राणे यांची स्नुषा सौ. राणे यांच्याकडून संगणकाचे धडे गिरविण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे वर्षभर वेगवेगळे नवनवीन कार्यक्रम महोत्सवी वर्षात राबविले जाणार असल्याचे ॲड. विलास परब यांनी सांगितले

हजारो मुलांना या शाळेने घडविले, शिकविले. डॉक्टर, वकील, शासकीय अधिकारी, शिक्षक, भारतीय सैन्यात, खाजगी नोकरीत, व्यावसायिक, अभियंते, कंत्राटदार, व्यापार वगैरे वेगवेगळ्या क्षेत्रात शाळेचे विद्यार्थी नावारूपास आहेत. असंख्य विद्यार्थी नोकरीनिमित्ताने मुंबईस्थित, परगावी आहेत. शाळेचे पांग कधीच फिटणारे नाहीत. माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत शतक महोत्सव साजरा करीत असतानाच नवपिढीला अद्यावत शिक्षण, इग्रंजी भाषेवर प्रभुत्व, अवकाश दर्शन कार्यशाळा, विज्ञान कार्यशाळा, संगणक ज्ञान, कलाकृती, वेगवेगळे उपक्रम राबवावेत, या हेतूने शाळेचे माजी विद्यार्थी ॲड. विलास परब यांचे नेतृत्वाखाली समिती स्थापन करुन आगळ्या वेगळ्या रितीने महोत्सव साजरा करण्याचे ठरवून निधी संकलनास सुरूवात केली. तलावाशेजारी हायवेनजिकची शाळा नजरेत भरावी, मुले शाळेत रमावीत अशा पध्दतीने शाळेचे रंगकाम, थोर पुरूषांची ओळख चित्रे , उत्कृष्ट गेट बांधणी, व्यासपीठ बांधणी इत्यादी स्वनिधीतून कामे केली आहेत. डॉ. मोहीते यांनी यापूर्वी लॕपटाॕप , बेंचेस प्रदान करून दातृत्व दाखविले आहे. महोत्सव शुभारंभी माजी विद्यार्थी विलास राणे यांच्या कुटुंबिय, हरिश्चंद्र मोरे, विठ्ठल राणे, विनायक पाटील यांनी तीन संगणक शैक्षणिक साॕफ्टवेअरसहीत टेबल व बेंचेस देऊन शाळेप्रती प्रेम व नवपिढीस संगणकीय ज्ञान अवगत व्हावे, हा हेतू ठेवला आहे. मधल्या काळात कोरोना विषाणूमुळे थोडा खंड पडला असला तरी ओसरगावातील या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळा सर्वांगाने समृद्ध करण्याचा चंग बांधल्याने शाळा अल्पावधीत नावारूपास येतेय. कोण म्हणतो जि. प. च्या शाळा मागे असतात? खाजगी शाळांकडे कल का वाढतो? हे सर्व प्रश्न आपल्या शाळेस लागू नाहीत, असे काम होऊन शाळेची भरभराट व्हावी, अशा एकमेव हेतूने समितीचे काम सुरू आहे. लहान थोर, पदाधिकारी असा कोणताही भेदभाव मनी न ठेवता मुलांच्या शिक्षणासाठी आपले कार्य सुरू ठेवायचे हाच प्रामाणिक हेतू असल्याचे ॲड. विलास परब व त्यांच्या समितीने आहे

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.