कॉंग्रेसतर्फे उद्या महावितरण अधीक्षक अभियंत्यांना घेराओ

0
43

कुडाळ (प्रतिनिधी) दि. १३ :

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ यांच्या अनागोंदी कारभाराविरोधात कुडाळ तालुका काँग्रेसच्या वतीने गुरुवार दिनांक १४ रोजी सकाळी साडेदहा वाजता अधीक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सिंधुदुर्ग, कुडाळ कार्यालयामध्ये घेराव आंदोलन करण्यात येणार आहे.
लॉक डाउन काळात व्यापारी व घरगुती वीज ग्राहक त्रासावलेले असताना सरसकट वीज वसुली करून वीज खंडित करण्याची धमकी देत असल्याबद्दल. वीज ग्राहकांना विज बिल भरण्यास मुभा देण्यात यावी तसेच दहा हजारापर्यंत वीज बिल तीन हप्त्यामध्ये भरण्याची मुभा देण्यात यावी.
तालुक्‍यातील वीज वारंवार खंडित होते त्यामुळे जनतेला होणाऱ्या त्रासाबाबत तसेच शेती पंप वीज जोडणी गेले पाच ते सहा वर्षे प्रलंबित आहेत. त्यांना तात्काळ वीज कनेक्शन देणे आदी मागण्यांबाबत वीज अधिकाऱ्यांना भेटणार आहेत.
कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी, फ्रंटचे पदाधिकारी, काँग्रेस कार्यकर्ते व काँग्रेस प्रेमी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रभारी कॉंग्रेस अध्यक्ष अभय शिरसाट यांनी केले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.