..तर प्रकाश पारकरांना आमदार नितेश राणेंना पण खंडणीखोर म्हणावे लागेल : शैलेश भोगले

0
145

कणकवली | प्रतिनिधी | दि. १३ :

कणकवली पंचायत समितीच्या भ्रष्टाचारी कारभाराची पोलखोल केल्याने प्रकाश पारकर सैरभैर झाले आहेत. वस्तुस्थितीवर न बोलता सभापतींची तळी उचलुन आमच्यावर बेताल आरोप करीत आहेत. त्यावेळी केलेल्या खोट्या तक्रारीमुळे न्यायालयाने माझी निर्दोष मुक्तता केली आहे. परंतु आमदार नितेश राणेंच्या विरोधात मे २०१७ मध्ये सांताक्रूझ पोलीस स्टेशन येथे खंडणीचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे उपसभापती पारकर यांनी माहिती घेऊन स्वतःचे आमदार नितेश राणेंना पण खंडणीखोर म्हणावे लागेल, असा उपरोधिक टोला शिवसेना तालुका प्रमुख शैलेश भोगले यांनी प्रकाश पारकर यांना लगावला आहे.

नाहीतर भाजपात किती खडणीखोरांचा भरणा झाला आहे, याचीही यादी आम्हाला जाहीर करावी लागेल. असे बिनबुडाचे आरोप करून पंचायत समितीच्या दारातील भ्रष्टाचार लपविण्याचा प्रयत्न पारकर बुवा करीत आहे. जिल्हा परिषदेचे उपअभियंता सुतार यांनीच सभापतीनी आगाऊ काम केल्याचे अनेकवेळा सांगितले आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या अंगणात झालेल्या कामाचा खुलासा सभापतीनि अगोदर करावा आणि नंतरच टीका करावी. त्यामुळे भ्रष्टाचार कोण करतय हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. काम अगोदर आणि टेंडर नंतर याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे आणि आम्ही केलेले आरोप पारकरांनी खोटे असल्यास सिध्द करावे, नाहीतर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असे आव्हान शिवसेना तालुका प्रमुख शैलेश भोगले यांनी दिले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.