माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती खालावली

0
54

नवी दिल्ली | दि. 13

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना ताप आल्यानंतर त्यांना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था दिल्लीत दाखल करण्यात आले आहे. एका सूत्राने सांगितले, “त्यांना दोन दिवसांपूर्वी ताप आला आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने आज त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या मनमोहन सिंग यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे आणि काळजी करण्यासारखे काही नाही.

 

मनमोहन सिंग यांना या वर्षी कोरोना विषाणूची लागण झाली होती. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना 19 एप्रिल रोजी एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर 29 एप्रिल रोजी त्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला. माजी पंतप्रधानांनी 4 मार्च आणि 3 एप्रिल रोजी कोरोना लसीचे दोन डोस घेतले होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.