देवगड दिवाणी न्यायालयाच्या वतीने आयोजित निबंध स्पर्धेत निशा पाटील प्रथम

0
71

देवगड | प्रतिनिधी | दि. १३ :

देवगड तालुका दिवाणी न्यायालय आयोजित तालुकास्तरीय निबंधलेखन स्पर्धेत जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेची विद्यार्थिनी कुमारी निशा बसवंत पाटील (इ १० वी) हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. गौरवपत्र व भेटवस्तू देऊन तिचा नुकताच देवगड दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश बी. आर. पाटील यांच्या हस्ते तिचा देवगड येथे सत्कार करण्यात आला. या प्रसंगी अविनाश माणगावकर, व्ही. डी. कदम, ए. पी.गीसावी,एस.आर. जाधव, पी. बी. गायकवाड, श्रीम. ज्योती तेंडुलकर, व देवगड तालुक्यांतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्यायाधीश पाटील यांनी कु निशा पाटील हिचे कौतुक करून तिला शुभेच्छा दिल्या . तिला प्रशालेतील शिक्षक सुनील जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष अँड अजित गोगटे, संस्थेचे सचिव संतोष कुलकर्णी, मुख्याध्यापक एस. बी. वालावलकर, पर्यवेक्षक एस.एम.गोगटे,यांनी अभिनंदन केले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.