पोलीस शिपाई पदांसाठी 18 ऑक्टोबरला लेखी परीक्षा

0
52

सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी | दि. १४ :

जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील एकूण 21 पोलीस शिपाई रिक्तपदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची OMR लेखी परीक्षा दि. 18 ऑक्टोबर रोजी प्रवेशपत्रांवर नमुद केलेल्या परीक्षा केंद्रांवर होणार आहे, अशी माहिती प्रभारी पोलीस उपअधिक्षक एस.बी.गावडे यांनी दिली.

या परीक्षेसाठी उमेदवारांना त्यांचे प्रवेश पत्र (Hall ticket) उमेदवारांच्या ई-मेलवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. तसेच https://mhpolicebharti.cbtexam.in या पोर्टलवरून देखील प्रवेशपत्र डाऊनलोड करता येतील. उमेदवारांनी लेखी परीक्षेकरिता प्रवेशपत्रावर नमुद असलेल्या परीक्षाकेंद्रांवर ओळखपत्रासह (उदा. आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, वाहन चालक परवाना इ.) वेळेत उपस्थित रहावे. उमेदवारांना प्रवेशपत्र प्राप्त होण्याबाबत काही अडचण असल्यास त्यांनी 18002100309 (सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायं. 6 वाजेपर्यंत) bhartimahapolice@gmail.com, पोलीस भरती मदत केंद्र, 02362- 228008 व पोलीस नियंत्रण कक्ष 02362-228614 या वर संपर्क करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.