विद्यालयाच्या गेटवरच धडकली स्कॉर्पिओ | दोघे गंभीर

0
233

कणकवली | प्रतिनिधी | दि. १४ :

तळेरे येथील मुंबई-गोवा महामार्गालगत असणाऱ्या वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालयाच्या गेट दुपारी 2 च्या सुमारास स्कॉर्पिओ कार येऊन धडकली. या अपघातात कार मधील व्यक्तीला गंभीर दुखापत झाली आहे.

खारेपाटण वरून कासार्डे येथे येणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीच्या चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने गाडी डिव्हायडर वर आदळत रस्ता ओलांडून शाळेच्या गेटवर जाऊन धडकली.  या गाडीमध्ये एकूण पाच प्रवासी असल्याचे समजत असून दोघांना गंभीर दुखापत झाली तर इतरांनाही किरकोळ दुखापत झाल्याने त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले. हि कार कासार्डे येथील संतोष पारकर याच्या भावाची असल्याची माहिती मिळाली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.