व्हिडीओग्राफर तसेच केबल व्यावसायिक संतोष सावंत यांना मातृशोक

0
82

कणकवली |प्रतिनिधी |दि.१४ :

शहरातील टेम्बवाडी येथील रहिवासी गं भा छाया शाहू सावंत (70 वर्ष) यांचे शुक्रवारी (14 ऑक्टोबर ) सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले .
गेले आठवडाभर त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरु होते. बर  वाटू लागल्याने त्यांना शुक्रवारी डिस्चार्जही देण्यात येणार होता. मात्र सकाळीच त्यांची प्रकृती अनपेक्षितरीत्या खालावली आणि त्यांचे निधन झाले. शहरातील प्रथितयश व्हिडीओग्राफर तसेच केबल व्यावसायिक संतोष सावंत आणि जिल्हा बँक कर्मचारी राजू सावंत यांच्या त्या मातोश्री होत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.