पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीस अटक | १८ पर्यंत पोलीस कोठडी

0
108

मालवण | प्रतिनिधी | दि. १४ :

गोळवण येथील सौ. जयश्री बाळकृष्ण खरात वय २७ या विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी पती बाळकृष्ण बमु खरात वय ५३ याच्या विरोधात पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. आज गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्याला १८ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

गोळवण येथील जयश्री बाळकृष्ण खरात या विवाहितेचा मृतदेह मंगळवारी दुपारी राहत्या घरात गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आला होता. याबाबत मालवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. जयश्री हिच्या मोबाईलच्या कव्हरमध्ये एक चिट्ठी पोलिसांना तपासादरम्यान सापडून आली. यात पती मुल होत नसल्याने शारीरिक व मानसिक छळ करतो त्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत नमूद करण्यात आले होते. याप्रकरणी मालवण पोलीसांचा तपास सुरू होता. काल बुधवारी मयत जयश्री हिची बहीण सौ संतोषी संतोष वरक कडावल कुडाळ यांनी मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. जयश्री हिचा पती बाळकृष्ण जयश्री हिचा मानसिक व शारीरिक छळ करत होता. मुलबाळ होत नसल्याने परत लग्न करण्यासाठी एका महिलेशी संबंध असल्याचेही बाळकृष्ण याने जयश्री हिला सांगितले होते. एकूणच जयश्री हिला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले. अशी तक्रार संतोषी यांनी दिली. त्यानुसार बाळकृष्ण खरात याच्या विरोधात मालवण पोलीस ठाण्यात ४९८ (अ), व आत्महत्येस प्रवृत्त केल्यापकरणी ३०६ कलमान्वये बाळकृष्ण बमु खरात वय ५३ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी रात्री बाळकृष्ण याला मालवण पोलिसांनी अटक केली. त्याला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १८ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी मालवण पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर हे अधिक तपास करत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.