‘विशाल’ नेतृत्वाचा होतोय लक्षवेधी वाढदिवस | भव्यदिव्य नियोजन | निलेश राणेंची खास उपस्थिती 

0
82
सावंतवाडी : दि. १४ : भाजपचे संयमी तेवढेच तडफदार युवा नेते विशाल परब यांचा वाढदिवस १५ ऑक्टोबरला शुक्रवारी मोठ्या दिमाखात आणि  विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होत आहे. वाढदिनाचं औचित्य साधून कोविड योद्ध्यांचा सन्मानही करण्यात येणार आहे. वाढदिवसाचा हा भव्यदिव्य कार्यक्रम सावंतवाडी शहरातील तिलारी कॉलनी इथं सायंकाळी ८ वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी खासदार निलेश राणेंची खास उपस्थिती असणार आहे.
विशाल परब यांच्या वाढदिवसाची मोठी उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे. कारण विशाल परब हे असं एक उभरत नेतृत्व आहे, ज्याने सध्या राजकीय गोटात आपल्या संयमी आणि तडफदार नेतृत्वाने हलचल माजवली आहे. मग तो नुकताच झालेला केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा जनाशिर्वाद यात्रेचा कार्यक्रम असो अथवा हल्लीच झालेला चिपी विमानतळ उद्घाटनाचा कार्यक्रम असो या दोन्ही कार्यक्रमामध्ये विशाल परब यांनी केलेली बॅनरबाजी कोकणात नव्हे तर संपूर्ण राज्यात लक्षवेधी ठरली. विशाल परब यांनी लावलेले ते  बॅनर इलेक्ट्रोनिक आणि प्रिंट मीडियापासून ते अगदी सोशल मिडियापर्यंत बातमीचा मोठा विषय ठरला. संपूर्ण महाराष्ट्रात विशाल परब यांचे बॅनर जसे झळकत होते, तसे विशाल परब याचं नेतृत्व कोकणात लक्षवेधी ठरत होत. अशा या लक्षवेधी नेतृत्वाचा शुक्रवारी वाढदिवस असल्याने राजकीय वर्तुळात त्याची एक  वेगळीच उत्स्तुकता निर्माण झाली आहे.
विशाल परब यांचा वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा करण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते देखील कामाला लागले आहेत.
सावंतवाडी त्यांच्या निवासस्थानी भव्य – दिव्य असा वाढदिवसाचा कार्यक्रम होणार आहे.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.