वैभववाडी तालुका आत्मा समिती अध्यक्षपदी जयेंद्र रावराणे यांची निवड

0
175

वैभववाडी | प्रतिनिधी | दि. १४ :

कृषी विभागाच्या वैभववाडी तालुका आत्मा समितीच्या अध्यक्षपदी जयेंद्र रावराणे यांची सर्वानुमते निवड झाली. पंचायत समिती सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली.
तालुक्यातील कृषी विभागाच्या आत्मा समीतीची कार्यकारणी आज जाहीर झाली. या समितीच्या अध्यक्षपदी माजी बांधकाम व वित्त सभापती जयेंद्र रावराणे यांची निवड झाली. बिनविरोध ही निवड प्रक्रिया पार पडली. मावळते अध्यक्ष महेश रावराणे यांनी नुतन अध्यक्षांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.निवडीनंतर नुतन अध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी भाषण केले. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आपण प्रयत्नशील असणार. शासनाच्या कृषी विषयक सर्व योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविल्या जातील. शेतीच्या माध्यमातून शेतकरी अधिक सक्षम करण्यासाठी समीतीचा प्रयत्न राहील. यावेळी सभापती अक्षता डाफळे, उपसभापती अरविंद रावराणे,जि.प.सदस्य सुधीर नकाशे,भाजपा तालुका अध्यक्ष नासीर काझी,सहाय्यक गटविकास अधिकारी शशिकांत भरसट,माजी सभापती बाप्पी मांजरेकर,किशोर दळवी, उत्तम सुतार,महेश गोखले, संजय रावराणे,श्री. हुले आदी उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.