राजन जाधवांचा अतुल बंगेंवर ‘असा’ पलटवार !

0
630

कुडाळ | प्रतिनिधी |  दि. १४ :

आमदार वैभव नाईक हे अत्यंत हुशार व्यक्तिमत्व आहे. म्हणूनच बंगे यांना लोकांना निराधार करण्यासाठी संजय गांधी निराधार योजनेचे आपल्याला अध्यक्षपद दिले. सातबारा फेरफार बदलण्यात आपण तरबेज आहात. बंगे हे शिवसेनेला लागलेली कीड आहे. जोपर्यंत राजन नाईक तालुका प्रमुख आहेत तोपर्यंत तुम्ही स्वप्नातील शिवसेनेचे तालुकाप्रमुख असाल. अतुल बंगे मुळेच पाट वालावल मतदार संघातील विकास खुंटला आहे. बंगे केवळ हुमरमळा या एका गावाचे नेते आहेत. चुकून त्यांना जबाबदारी दिली या दोन्ही मतदारसंघांची जबाबदारी दिली असावी. म्हणूनच पाट वालावल या मतदारसंघात विकास झाला नाही, अशी खरमरीत टीका नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले पंचायत समिती सदस्य राजन जाधव, डॉक्टर सुबोध माधव आणि प्राजक्ता प्रभू यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

कुडाळ पंचायत समितीच्या सभागृहात हि पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी समितीचे कुडाळ पंचायत समितीचे सभापती नूतन आईर, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, भाजपा तालुकाध्यक्ष विनायक राणे, ओरस मंडल अध्यक्ष दादा साईल, पंचायत समिती सदस्य गोपाळ हरमलकर, युवा मोर्चाचे रूपेश कानडे पप्पू तवटे आदी उपस्थित होते.
यावेळी माजी सभापती तथा विद्यमान पंचायत समिती सदस्य राजन जाधव म्हणाले, आम्ही अतुल बंगे यांच्या सारखे स्वहितासाठी या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करत राहिलो नाही. शिवसेने आम्हांला सन्मान दिला. माझ्या घरासमोरील जी विहीर आहे तीचा आमदार खासदार फंडाशी नाही. ती विहीर विशेष घटक योजनेतील आहे. हे माहित करुन घ्यावे. मगच बोलावे. वैभव नाईक जेव्हा आले तेव्हापासून सेल्फी गॅंग तयार झाली. नाईक आले की पुढे पुढे करायचे आणि आपल्या पाहिजे तेथे निधी न्यायचा. एवढेंच बंगेची कर्तबगारी. मी माझ्या मतदारसंघात जी कामे आणली ती रणजित देसाई, अंकुश जाधव यांच्या माध्यमातून. विशेष घटक योजनेचा फायदा माझ्या मतदार संघात झाला.

यावेळी सुबोध माधव म्हणाले, शिवसेनेत अतुल बंडे यांनी गटबाजी करण्या पलीकडे काहीच केले नाही. विकास कामांबाबत आमच्याकडे दुर्लक्ष केला गेला. माझी कारकीर्द शिवसेनेतूनच झाली. परंतु बंगे सारख्या लोकांमुळे गटबाजीचे राजकारण घडले. मी उपसभापती पदासाठी इच्छुक होतो. हे सर्वांना माहीत होतै परंतु मला विचारले गेले नाही. याच बंगेनी गांधीनगर हा पाटचाच भाग आहे परंतु स्वार्थासाठी हुमरमळा गावाला जोडला.

तर प्राजक्ता प्रभू म्हणाल्या मी वालावल मतदारसंघातून निवडून आले परंतु वालावल गावात शिवसेनेचे एकही विकास काम झाले नाही. ५०० ते ७०० लोकसंख्या असलेला हुमरमळा गावात ३.५० कोटीची कामे तर १५०० ते २००० लोकसंख्या असलेल्या वालावल गावात एका पैशाचा निधी नाही. ज्या माणसांवर मतदारसंघाची जबाबदारी दिली त्या अतुल बंगेनी पार पाडली नाही. अशाप्रकारे घणाघाती टीका तीनही पंचायत समिती सदस्यांनी केली.

यावेळी सभापती नूतन आईर यांनी तिघांचे स्वागत करत आता आम्ही पूर्ण बहुमतात आहोत त्यामुळे भिती नाही. अशी प्रतिक्रिया दिली. तर दादा साईल यांनी म्हणाले, शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी भाजपात प्रवेश केलेल्या सदस्यांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी केली. मी त्यांना सांगू इच्छितो की काही महिन्यांपूर्वी भाजपचे काही सदस्य शिवसेनेत प्रवेश केला तेंव्हा त्यांचा राजीनामा घेतला होता का याचे भान राखत बोला. या सर्वांना योग्य तो सन्मान आम्ही देऊ अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.