कोचरा उपसरपंचपदी शिवसेनेच्या प्रतीक्षा पाटकर

0
163

वेंगुर्ला | प्रतिनिधी | दि. १४ :

तालुक्यातील कोचरा गावचे उपसरपंच सुशिल सहदेव राऊळ यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी आज (१४ ऑक्टोबर) निवड प्रक्रिया घेण्यात आली. यावेळी या पदासाठी सौ प्रतीक्षा चंद्रशेखर पाटकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निकड करण्यात आली.


यावेळी सरपंच साची फणसेकर यानी नुतन उपसरपंच यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. त्यावेळी माजी उपसरपंच सुशील राऊळ, ग्रा.पं. सदस्य स्वरा हळदणकर, सरस्वती राऊळ, पूजा गोसावी, योगेश तेली- कोचरेकर आदी उपस्थित होते. दरम्यान यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परब, उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई, सुनील डुबळे, तालुका महिला संघटिका सुकन्या नरसुले, भोगवे माजी सरपंच तथा जेष्ठ मार्गदर्शक महेश सामंत, केळुस माजी सरपंच योगेश शेटये, मायने शाखाप्रमुख आपा राऊळ, चंद्रशेखर पाटकर, माजी उपसरपंच अनंत म्हापणकर आदींनी नुतन उपसरपंच यांचे अभिनंदन केले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.