तुमच्या आशिर्वादानेच मी एवढा मोठा झालो – विशाल परब

0
73

कुडाळ | प्रतिनिधी | दि. १४ :

जेव्हा वाढदिवस गावाच्या वतीने साजरा केला जातो तेव्हा ते आशिर्वाद सदैव माझ्या पाठीशी असतात अशी प्रतिक्रीया भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी दिली आहे. “बार बार ये दिन आये” म्हणत वाडोस या ठिकाणी विशाल परब यांचे ग्रामदैवत रवळनाथ मंदिरात हजारो गावकरांनी विशाल परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ते व्यासपीठावरून बोलत होते.

तुमच्या आशिर्वादानेच मी एवढा मोठा झालो. गावातील प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला रोजगार देण्याचा माझा मानस आहे. त्यासाठी मी संकल्प केला आहे तुमच्या आणि रवळनाथाच्या आशिर्वादाने तो लवकर पुर्ण होणार आहे.असा आशावाद विशाल परब यांनी व्यक्त केला. नवरात्रीच्या निमीत्ताने व वाढदिवसाचे औचित्य साधून गावासाठी दशावतारी नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विशाल परब, सौ वेदिका विशाल परब, दिनेश शिंदे, संजय म्हाडगुत, संदिप म्हाडगुत, बाबल म्हाडगुत, संदिप म्हाडगुत ,समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.