“मीडियाच्या माध्यमातून माझ्याशी बोलण्याची गरज नाही” | सोनिया गांधींनी बैठकीतच काँग्रेस नेत्यांना खडसावलं-

0
95

नवी दिल्ली | ब्युरो न्यूज | दि. १६ :

पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी, अशोक गेहलोत, आनंद शर्मा यांच्यासह पक्षाचे ५२ वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित आहेत. कार्यकारिणीच्या बैठकीत नवीन अध्यक्षपदासाठी चर्चा होण्याची शक्यता होती. त्यानुसार याबाबत सोनिया गांधी यांनी भाष्य केले आहे. सोनिया गांधी यांनी याशिवाय सध्याची राजकीय परिस्थिती, आगामी विधानसभा निवडणुकांबाबतही चर्चा केली आहे.
या वेळी सोनिया गांधी यांनी बैठकीत काँग्रेस नेत्यांना सुनावले आहे. “मी पक्षाच्या नेत्यांशी खुल्या मनाने बोलते पण माध्यमांद्वारे माझ्याशी बोलण्याची गरज नाही,” असे म्हटले आहे. प्रत्येक पक्षाच्या सदस्याला काँग्रेसचे पुनरुज्जीवन हवे आहे, पण यासाठी एकता आणि पक्षाचे हित सर्वोपरी ठेवणे आवश्यक आहे असे सोनिया गांधी यांनी म्हटले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.