वैभववाडीत दुर्गामातेंच विसर्जन

0
298

वैभववाडी | प्रतिनिधी | दि. १६ :

शहरातील सार्वजनिक दुर्गामातेंच आज सायंकाळी विसर्जन झाले. ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढत देवीला निरोप दिला.
नवरात्रीनिमित्त शहरात दोन ठिकाणी दुर्गा देवीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली होती.दुर्गामाता सार्वजनिक उत्सव मंडळ वैभववाडी यांच्यावतीने दत्तमंदिरनजीक तर रणझुंजार कला क्रिडा मंडळ वैभववाडी यांच्यावतीने संभाजी चौक येथे देवीची प्राणप्रतिष्ठापना केली होती. गेले नऊ दिवस देवीची सेवा करून आज निरोप देण्यात आला.या नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने दुर्गामाता सार्वजनिक उत्सव मंडळ वैभववाडी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. या शिबिरात ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.दोन्ही मंडळाकडून या उत्सवानिमित्त सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. देवीची मनोभावे सेवा करून आज विसर्जन करण्यात आले. ढोलताशांच्या गजरात मिरवणूक देखील काढली होती.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.