आडेलीतील कृष्णा कासले यांचा मृतदेह आढळला विहिरीत

0
120

वेंगुर्ला | प्रतिनिधी | दि. १६ :

वेंगुर्ले तालुक्यातील आडेली खुटवळ वाडी येथील कृष्णा गणपत कासले (५२) यांचा मृतदेह येथील विहिरीत आढळून आला. आजाराला कंटाळून आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याची नोंद वेंगुर्ले पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

आडेली खुटवळवाडी येथील कृष्णा कासले गेली दोन-तीन वर्षांपासून क्षय रोगाने आजारी होते. त्यांच्या आजारावर उपचार सुरू होते मात्र गुण पडत नव्हता. या आजाराला कंटाळूनच त्यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. 15 ऑक्टोंबर रोजी ते बाहेर फिरून येतो असे सांगून घरातून 8 वाजण्याच्या सुमारास बाहेर पडले. मात्र बराच वेळ झाला तरी ते घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांचे भाऊ दत्ताराम कासले त्यांना गावात सुरू असताना तेथील सार्वजनिक विहिरीच्या बाजूला त्यांचे चप्पल हातातील काठी दिसली. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता कृष्णा यांचा मृतदेह त्यांना पाण्यात तरंगत असल्याचे दिसून आले. तात्काळ त्यांनी आजूबाजूच्या ग्रामस्थांना व वेंगुर्ले पोलिस ठाण्यात याबाबत कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला व शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, भाऊ, भावजय, पुतण्या, बहिणी असा परिवार आहे. याप्रकरणी अधिक तपास वेंगुर्लेचे पोलीस उपनिरीक्षक व्ही. ए. केसरकर करीत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.